महत्वाच्या बातम्या

 क्रिकेट स्पर्धेत आमगाव येथील फ्रेंड्स क्रिकेट क्लब प्रथम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : ब्रम्हपुरी तालुक्यातील दुधवाही गावातील युवा क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य खुले शॉर्ट पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 14 ते 29 जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेत देसाईगंज तालुक्यातील आमगाव गावातील फ्रेंड्स क्रिकेट क्लब या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून त्यांनी प्रथम पारितोषिक 50,000 हजार रु. जिंकले. तर त्याच स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली गावातील संघाने पटकाविले. त्या विजयी गटाला 30000 हजार रु. तर तृतीय क्रमांक देसाईगंज तालुक्यातील कुरुड गावातील क्रिकेट संघाने पटकाविला असून त्यांना 20000 हजार रु. जिंकले. 

यात व्ययक्तिक बक्षीस सुद्धा देण्यात आले, त्यात युवा क्रिकेट क्लब दुधवाही यांना प्राप्त झाले. बक्षीस वितरण दरम्यान दूधवाही गावातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार, शिक्षकवृंद यांनी व्यसनमुक्तीचा संदेश गावकऱ्यांना, युवा पिढीला दिला. उपस्थित गावकऱ्यांच्या व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित बक्षित वितरण सोहळा पार पडला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos