महत्वाच्या बातम्या

 सहकार चळवळीतून शेती व्यवसायात मोठी क्रांती : माजी मंत्री वडेट्टीवार


- तालुका काँग्रेस तर्फे सहकार मेळाव्याचे आयोजन - नियुक्त संचालकांचा सत्कार 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला संशोधन शेतीतून प्रगती साधन्या हेतू मुबलक वित्त सहाय्य करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांचा मोलाचा वाटा आहे. अशा प्रामाणिक सहकारी संस्था यांच्या साह्याने शेतकऱ्यांचे आर्थिक प्रश्न सुटून शेतकऱ्यांना प्रगतीची चालना मिळाली. सहकार चळवळीतून शेती व्यवसायात मोठी क्रांती देखील घडून आली. व विना सहकार नाही उद्धार या ब्रीदाची प्रचितीची अनुभूती सर्वांना झाली असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी केले ते घोडाझरी (रिसॉर्ट) येथे आयोजित सहकार मेळाव्या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी आयोजीत कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हा बँक संचालक संदीप गड्डमवार, काँग्रेस ज्येष्ठ नेते चंद्रशेखर चन्ने, तालुका काँग्रेस प्रवक्ता बाबुराव गेडाम, काँग्रेस सेवा सहकारी विभागाचे गट नेते मधुकर बोरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोंधे, शहराध्यक्ष सुनील उट्टलवार प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, राज्याच्या प्रगतीत सहकार क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे. सहकार क्षेत्रातून शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळविणे अगदी सोपे झाले असून मर्यादित पीक कर्ज हे बिनव्याजी असल्याने याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांसाठी सहकार क्षेत्रामार्फत विविध विकासात्मक व कल्याणकारी योजना अमलात आणण्याचे काम मागील काळात काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने केले असून शेतमालांना रास्त भाव मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काँग्रेस सरकारने नेहमीच सकारात्मक भूमिका वठविल्याचे यावेळी माजी मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
तर अध्यक्षीय भाषणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बँकांच्या विविध वित्त पुरवठा करणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. तसेच तोट्यात असलेली बँक नफ्यात आणून याचा लाभांशही सेवा सहकारी संस्था बचत गटांना मिळवून देण्यात काँग्रेस प्रणित बँक संचालक मंडळांनी केल्याचे सांगितले.
तत्पूर्वी सिंदेवाही तालुक्यातील मागील काही दिवसांपूर्वी 21 सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडल्या यात जास्तीत जास्त सेवा सहकारी संस्थामध्ये काँग्रेस प्रणित पॅनलचा विजय झाला. या निमित्ताने नवनिर्वाचित सेवा सहकारी संस्था संचालक मंडळांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिंदेवाही- लोनवाही नगरपंचायतचे  नगरसेवक युनुस शेख यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने शिंदेवाही तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांचे संचालक व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंदेवाही तालुका  काँग्रेस पदाधिकांनी आता परिश्रम घेतले.

सहकार मेळाव्यात भाजप पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस प्रवेश
सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. भाजपाच्या अंतर्गत कलहामुळे नाराज असलेले उपसरपंच आनंदराव श्रीधर सोनवणे यांनी भाजप कार्यकर्ते नरेश बोरकर, अर्चना चनफने, जगदीश सहारे, सुरेश बोरकर, भगवान मेश्राम, किशोर चांदेकर, गजानन चांदेकर, निळकंठ मेश्राम यांनी माजी मंत्री तथा क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यामुळे नांदगांव येथील भाजपला मोठी खिंडार पडली आहे. 





  Print






News -




Related Photos