अखेर मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याचे झाले उघड, आरोपींना गुजरात राज्यातुन अटक


- आरोपींची  हत्येची कबुली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
जिल्हा प्रतिनिधी  / वर्धा :
  मागील आठ ते दहा दिवसांपासून घरून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय सुनील हातागडे रा. अशोक नगर वर्धा याची हत्या झाल्याचे उघड झाले  असून हत्या करणाऱ्या मृतकाच्या मित्रांना वर्धा पोलिसांनी गुजरात राज्यातून अटक केली आहे. 
गेल्या काही दिवसाआधी आरोपी परवेज याच्या सोबत मृतक होता आणि तो घरी परतलेला नाही.  यावरून पोलिसांनी शोध सुरु केला असता गुजरात येथील हिम्मतनगर भागात त्याच्या मोबाईल लोकेशनवर पोलिसांनी जाऊन अटक करून आरोपीना वर्धा येथे आणले. पोलिसांच्या चौकशीत सुनीलची हत्या करून  त्याला हिंगणघाट गोजी परिसरातील नाल्यात  टाकल्याचे कबूल करण्यात आल्याचे सांगितले. यात परवेज याचे दोन मित्र मोबीन व अब्बास याना सुद्धा सह गुन्हेगार म्हणून अटक केली आहे. 
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक  पिंजले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने,  सहायक फौजदार दत्तात्रेय ठोबरे, सचिन इगोले, विशाल बंगाले, संजय पटले हे करीत आहेत.     Print


News - Wardha | Posted : 2018-11-01


Related Photos