राज्यात पुढील ५ दिवस अतिवृष्टी होण्याचा भारतीय हवामान विभागाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
मान्सून राज्यात सक्रीय झाला आहे. अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. दरम्यान, राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पावसासह अतिवृष्टी   होण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने   दिला आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज मान्सूनचे आगमन झाले. मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस  झाल्याने मुंबईकरांची दाणादाण उडाल्याचे पाहायला मिळाले. कोकणातही मुसळधार पावसासह ढगफुटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर दुसरीकडे  कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (Weather Alert ) अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. (Heavy Rains in Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.
पहिल्याच पावसाने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. चेंबूर परिसरात देखील पावसाचा जोर दिसून येत आहे. चेंबूरमध्ये पावसामुळे नागिरकांना वाहतुकीला त्रास सहन करावा लागत आहे. दरवर्षी प्रशानसाकडून आश्वसन देऊनही काम योग्यरित्या होत नसल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, कांदिवली, अंधेरी, मालाड, जोगेश्वरी भागात अधून मधून सतत पावसाच्या सरी सुरू आहेत. त्यामुळे काही सखल भागात पाणी जमा होण्यासाठी देखील सुरू झाले आहे. मुंबईच्या गांधी मार्केट भागातही काही सखल भागात पाणी साचले आहे. अनलॉकमुळे कार्यालय 40 टक्के उपस्थितीने सुरु झाल्यामुळे ऑफीस गाठण्यासाठी नागरिक पाण्यातून कसरत कसरत करावी लागत आहे. तर खासगी वाहनांनाही धिम्यागतीने पाण्यातून गाड्या काढव्या लागत आहेत. 
  Print


News - Rajy | Posted : 2021-06-09


Related Photos