महत्वाच्या बातम्या

 सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावरच महिला मेळावा यशस्वी


- आमदार डॉक्टर देवराव होळी 

- महिला मेळाव्याला यशस्वी करणाऱ्या सर्व मातृशक्तीचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केले अभिनंदन 

- भाजपा प्रदेशाच्या नागपुर येथील  बैठकीमुळे महिला मेळाव्याला उपस्थित न राहता आल्याने व्यक्त केली खंत 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या महिला मेळाव्याला असलेली प्रचंड उपस्थिती ही महिला मोर्चाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे प्रतिपादन करीत महिला मेळाव्याला यशस्वी करणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. 

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश बैठकीच्या निमित्ताने नागपूरला उपस्थित राहणे अत्यावश्यक असल्याने या महिला मेळाव्याला आपण उपस्थित राहू शकलो नाही याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजच्या मेळाव्याने जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाला मोठी शक्ती मिळाली असून भविष्यात भाजपा महीला मोर्चाचे संघटन उभारण्यासाठी या मेळाव्याची नक्कीच मदत होईल असे या मेळाव्यावर प्रतिक्रिया देतांना आमदार डॉक्टर देवराव होळी म्हणाले. 

  Print


News - Gadchiroli
Related Photos