नक्षल घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक


- चार राज्यांतील पोलिसांचे एकमत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  महाराष्ट्रात घातपात केल्यानंतर माओवादी तेलंगणा व छत्तीसगडमध्ये पळ काढतात. अशा घटना घडल्यानंतर तत्काळ सर्व सीमा सील करणे आवश्यक आहे. सीमा सील केल्यास माओवाद्यांना हुडकून काढणे सोयीचे ठरेल, यावर चार राज्यांतील पोलिसांचे एकमत झाले. त्यानुसार उपयायोजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे. नक्षलविरोधी अभियानतर्फे सुराबर्डी येथील अपारंपरीक अभियान प्रशिक्षण केंद्रात बुधवारी चार राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची आंतरराज्यीय समन्वय बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला. 
छत्तीसगढ, मध्यप्रदेश व तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुका शांततेत पार पडण्यासाठी महाराष्ट्र अन्य माओवादग्रस्त राज्यांना संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलिस महासंचालक व व्यवस्थापकीय संचालक डी. कन्नकरत्नम यांनी तीन राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
माओवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी तसेच त्यांच्या बिमोडासाठी पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना, माआवोद्यांच्या माहितीचे आदानप्रदानही बैठकीदरम्यान करण्यात आले. छत्तीसगड, मध्यप्रदेश व तेलंगणात निवडणुका आहेत. त्या शांततेत पार पाडण्यासाठी सर्व राज्यांनी दक्ष राहून कोणत्याही भेदभावाशिवाय सहकार्य करण्यावर भर दिला. मध्यप्रदेशचे पोलिस महासंचालक व्ही. के. सिंग, अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय सक्सेना(ऑपरेशन), पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक शरद शेलार, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, बालाघाटचे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक टी. शेखर, ग्रे हाऊन्डचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीनिवासन रेड्डी, जबलपूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक अनंतकुमार सिंग, सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक जे. बी. संगवान, बालाघाटचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. पी. व्यंकटेश्वरराव, पोलिस उपमहानिरीक्षक इर्षाद अली, छत्तीसगढचे पोलिस उपमहानिरीक्षक सुंदरराज पी. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, गोंदियाचे पोलिस अधीक्षक हरीश बैजल यांच्यासह आयटीबीपी, बीएसएफ, सीआरपी व छत्तीसगड, मध्यप्रदेश व तेलंगाना येथील पोलिस अधीक्षक उपस्थित होते.  Print


News - Nagpur | Posted : 2018-10-25


Related Photos