भरमार बंदुकीसह ५ शिकारी वनविभागाच्या जाळ्यात


- गडचिरोली वनविभागाची कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली लगत असलेल्या बोदली जंगल परिसरात वनविभागाच्या पथकाने भरमार बंदुकीसह ५ शिकाऱ्यांना पकडल्याची घटना काल २४ मार्च २०२१ रोजी घडली. गुल्लुसिंग शेरसींग दुधानी रा. गोकुळनगरख् नानुसींग पटवा रा. गोकुळनगर, बालाजी मुकुंदा दळांजे रा विहिरगाव, पिंकुष सुरेश खोब्रागडे रा. चांदाळा व विनोद किसन नरोटे रा. चांदाळा (टोला) असे अरोपींची नावे आहेत.
गडचिरोली वनपरिक्षेत्रात वाघाचा वावर असल्याने  काल सकाळच्या सुमारास क्षेत्र सहाय्यक पी जेणेकर यांच्यासह वनरक्षक भसारकर, चरणदास बोडे, धम्मादीप दुर्गमवार गस्त करीत असताना दुपारी १२. ३० वाजताच्या सुमारास बोदली परिसरातील जंगलात ५ इसम संशयरीत्या फिरतांना दिसून आले. 
संशयित इसमाची क्षेत्र सहाय्यक पी जेणेकर यांनी तपासणी केली असता त्यांच्याकडे भरमार बंदूक व स्फोटक पदार्थ आढळून आले. सदर इसमांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला. सदर घटनेबाबत माहिती मिळताच गडचिरोली वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी डि.व्हि.कैलुके यांनी घटनास्थळी जाउन अधिक तपास व विचारपुस केली असता सदर आरोपी हे जंगलामध्ये जाउन वन्यप्राण्यांची भरमार बंदुक व बाॅम्ब गोळयांचा वापर करून शिकार करीत असत. कक्ष क्रमांक 176 मध्ये 5 ठिकाणी बाॅम्ब गोळे जमीनीवर पेरून ठेवल्याचे आरोपींनी प्रत्यक्ष वनाधिकारी यांना दाखविले. सदर आरोपींवर प्राथमिक वनअपराध सुचना जारी करून आरोपीविरूध्द वन्यजीव संरक्षण कायदा 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपींना गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 15 दिवसांसाठी सर्व आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
सदर कारवाई गडचिरोलीचे वनसंरक्षक डाॅ. किशोर मानकर यांच्या मार्गदर्शनात व उपवनसंरक्षक डाॅ. कुमारस्वामी व सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांच्या नेतृत्वात पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी डि.व्ही. कैलुके, क्षेत्रसहाय्यक प्रमोद जेनेकर, वनरक्षक भसारकर इत्यादी करीत आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-03-25


Related Photos