कामगारांना आर्थिक सक्षम बनविण्यासाठी राज्य सरकार कृतीशील : नगराध्यक्षा योगिता पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
कामगारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. दररोज पोटाची खळगी भरण्यासाठी कष्ट करावे लागते. कामगारांचे  आयुष्य नेहमी कठीण कामे करण्यातच खर्ची होत असते. त्यामुळे नोंदणीकृत कामगारांना प्रति मजूर ५ हजार रूपये देवून आर्थिक सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन कृतीशील  वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
गडचिरोली नगरपरिषदेच्या नगरभवन परिसरात कामगार किटचे वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्षा योगिता पिपरे बोलत होत्या.
तसेच नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते नोंदणीकृत कामगारांना हेल्मेट, जॅकेट, मच्छरदाणी असलेल्या कामगार किटचे वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता पिपरे तर प्रमुख अतिथी म्हणून लेबर ऑफीसर उईके, नगरसेवक प्रमोद पिपरे, अतुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, कामगारांनी मिळालेल्या किटमधील साहीत्याचा उपयोग करावा. कामावर मिळालेले साहीत्य घालूनच जावे. जीव धोक्यात घालून काम करू नये. कामगारांनी काम करीत असतांना स्वतःची काळजी घ्यावी. त्यासोबतच परिवाराचीही काळजी घ्यावी, असेही सांगितले.  यावेळी जवळपास दोन हजार कामगारांना कामगार किटचे वाटप करण्यात आले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-21


Related Photos