महत्वाच्या बातम्या

 जिल्ह्यात १९ जुलैपर्यंत कलम ३७ अन्वये मनाई आदेश लागू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७(१)(३) अन्वये दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते १९ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या कालावधीत शस्त्रे, स्फोटक किंवा दाहक पदार्थ बाळगणे, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे जमा करणे, चिथावणीखोर घोषणा, भाषणे, गाणी, फलक किंवा अन्य साहित्याद्वारे सार्वजनिक शांतता भंग होईल अशा कृती करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

तसेच उपविभागीय दंडाधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मिरवणुका, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यासही मनाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, संघटना व इतरांकडून आंदोलन, मोर्चे किंवा सभा आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा आदेश जारी करण्यात आला असून, नागरिकांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos