महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहात नवीन गृहपाल योगेश फुसे यांचे उत्साहात स्वागत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्र. २ येथे नवीन गृहपाल म्हणून योगेश जी. फुसे सर रुजू झाले असून, वसतिगृहातील कर्मचारी वृंदाच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अत्यंत उत्साहात आणि जिव्हाळ्याने स्वागत करण्यात आले.

योगेश फुसे सर हे यापूर्वी चामोर्शी तालुक्यातील घोट येथील शासकीय वसतिगृहात गृहपाल म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बदली गडचिरोली येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह क्र. २ येथे झाली आहे. पदभार स्वीकारण्यासाठी वसतिगृहात आगमन होताच सहकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

या स्वागत प्रसंगी वसतिगृहातील  कर्मचारी रवींद्र भांडेकर,. प्रवीण मडावी, कर्मचारी. रोशन तपासे व  भीमकला लाभे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांनी फुसे सरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

नवीन गृहपालांच्या मार्गदर्शनाखाली वसतिगृहाचा कारभार अधिक कार्यक्षमतेने चालेल आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास याप्रसंगी उपस्थित कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. फुसे सर यांनीही सर्वांचे आभार मानून वसतिगृहाच्या प्रगतीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस बोलून दाखवला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos