महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांच्या खात्यात २१८.१८ कोटी धानाचे चुकारे जमा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीच्या अनुषंगाने रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ करिता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम रुपये २१८.१८ कोटी ऑनलाईन पद्धतीने जमा केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील ज्या धान खरेदी केंद्राच्या प्रमाणीत हुंड्या कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहे. त्या धान केंद्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

शासन पत्रान्वये रब्बी पणन हंगाम २०२५-२०२६ मधील धान खरेदीची अंतिम मुदत ३० जून २०२६ पर्यंत आहे. सदर कालावधीत धान आणि मका खरेदी करिता शासनाने दिलेल्या सर्व निर्देशांचे तंतोतंत पालन करूनच नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान आणि मका खरेदी पूर्ण करण्यात यावी, असे आवाहन सावन कुमार  जिल्हाधिकारी  यांचे निर्देशानुसार, सुधीर एस. पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos