जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भाजपच्या वतीने वृक्षारोपण : एक पेड माँ के नाम उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका मंडळाच्या वतीने एक पेड माँ के नाम या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
यावेळी भाजपा चामोर्शी तालुका मंडळ प्रभारी तथा महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या., पुणेचे संचालक इंजि. प्रमोद पिपरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना वृक्षांचे मानवी जीवनातील योगदान स्पष्ट केले. वृक्ष हे पृथ्वीचे फुफ्फुस असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला तालुका अध्यक्षा रोशनी वरघंटे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष भास्कर भुर्रे, तालुका महामंत्री शेषराव कोहळे, वासुदेव चिचघरे, ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, सोपान नैताम, खंडुसिंग खसावत, किशोर गटकोजवार, सतीश भांडेकर, जानुजी बोधलकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
एक पेड माँ के नाम या उपक्रमाद्वारे केवळ वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचाही संदेश देण्यात आला. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी वृक्ष लागवड आणि त्यांचे संरक्षण अत्यावश्यक असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.
या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून भविष्यातही अशाच सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
News - Gadchiroli




Petrol Price




