महत्वाच्या बातम्या

 पाटण पोलिसांची धडक कारवाई : अवैध देशी दारूच्या २३ पेट्यांसह २४.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकास अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील पाटण पोलिसांनी अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई करत देशी दारूच्या २३ पेट्यांसह महिंद्रा पिकअप वाहन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून मुज्जू इकबाल सय्यद (वय २९ ) रा. मरकागौदी, ता. जिवती, जि. चंद्रपूर याला अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, २० जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास पाटण पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. गडचांदूरकडून पाटणच्या दिशेने एक महिंद्रा पिकअप वाहन अवैधरित्या व विनापरवाना देशी दारूची वाहतूक करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या आधारे पोलिसांनी पुनामुद्रा फाटा रोड परिसरात नाकाबंदी केली. काही वेळातच बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनानुसार पांढऱ्या रंगाचे महिंद्रा पिकअप वाहन क्रं एमएच-३४ बीजी-४१२४ घटनास्थळी येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून त्याची कसून तपासणी केली असता वाहनाच्या मागील डाळ्यामध्ये अवैध देशी दारूच्या एकूण २३ पेट्या आढळून आल्या.

तपासणीदरम्यान चालक मुज्जू इकबाल सय्यद याच्याकडे दारू वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना, पास अथवा अधिकृत कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत देशी दारूचा साठा व वाहनासह एकूण २४ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपीला अटक केली.

या प्रकरणी आरोपी विरुध्द पाटण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे तथा गडचांदूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण चे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल तायडे, सफौ गुलाब कोवे, पोअं ज्ञानेश्वर मांडवे, रामचंद्र पुष्पपोल, तिरुपती राठोड, मपोअं पौर्णिमा मडावी यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos