महत्वाच्या बातम्या

 भंडारा : चिचोली फाटा येथे अवैध रेती वाहतूक उघड : ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तुमसर तालुक्यातील मौजा चिचोली फाटा हद्दीत पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करत रेतीसह ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली. ही कारवाई २४ मे रोजी पहाटे ३:१५ वाजताच्या दरम्यान करण्यात आली. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ७ लाख ६ हजार रुपये असल्याचा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना चिचोली फाटा परिसरात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर क्रमांक एमएच-३६-एजी-९८५३ व ट्रॉली क्रमांक एमएच-३६-एएल-३४५७ ताब्यात घेतली. तपासणीदरम्यान ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रॉस रेती आढळून आली. संबंधितांकडे रेती उत्खनन व वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे समोर आले.

या प्रकरणी ट्रॅक्टर चालक रोहित यशवंत कुंभरे (वय २७) तसेच ट्रॅक्टर मालक सुभाष गजानन नरकंडे (वय ३५, दोघेही रा. लेंडेझरी) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रॅक्टर, ट्रॉली व रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तक्रारीवरून तुमसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक गणेश मन्नाडे करीत आहेत. अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.





  Print






News - Bhandara




Related Photos