महत्वाच्या बातम्या

 गॅस सिलिंडर दराबाबत सरकारने घेतला हा निर्णय : कोट्यवधी ग्राहकांना फटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : देशभरातील गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींबाबत सरकारी तेल कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे तुम्हाला खर्च करावे लागणार आहेत. महागाईत आणखी तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे. म्हणजेच, आतापासून तुम्हाला एलपीजी बुकिंगसाठी आणखी रुपये मोजावे लागतील.

सरकारी तेल कंपन्यांकडून व्यावसायिक गॅस सिलिंडरवर 200 ते 300 रुपयांची सूट देण्यात येत होती. ही सुट आता रद्द करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणाऱ्या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि HPCL आणि BPCL यांना माहिती देताना त्यांनी वितरकांना सांगितले आहे की, आतापासून कोणत्याही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सवलतीची सुविधा मिळणार नाही. हा निर्णय 8 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे. 

इंडियन ऑइलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 किलो आणि 47.5 किलोचे सिलिंडर सवलतीशिवाय विकले जातील. यासोबतच HPCL ने म्हटले आहे की 19 किलो, 35 किलो, 47.5 किलो आणि 425 किलोच्या सिलिंडरवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती रद्द केल्या जात आहेत. 





  Print






News - Rajy




Related Photos