पंडीत दिनद्याल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नोकरी शोधणारे व नोकरी देणारे यांना एकाच व्यासपीठावर आणून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व नियोक्ता / उद्योजकांना कुशल मुनष्यबळ उपलब्ध करून देण्याकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, यांच्या वतीने १५ मे २०२६ रोजी वेळ स. १० वा पासून सामाजिक न्याय भवन, जिल्हा समाजकल्याण कार्यालय, LIC चौक जवळ, गडचिरोली येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला आहे.
सदर रोजगार मेळाव्यास एकुण २५ उमेदवारांनी सहभाग नोंदविला आहे. व L & T Finance , नागपूर या नामांकित उद्योजकांनी सुध्दा सहभाग घेतला असून Fild Officer या पदाकरीता गडचिरोली जिल्हयामध्ये एकुण - २० जागा घेऊन उद्योजकांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिले. सदर रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी उद्योजकामार्फत उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेवून त्यामध्ये एकुण २२ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यांत आलेली आहे. व उर्वरित उमेदवारांना पुढील प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करण्यांत आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




