सरपंच, सरपंचाचा पती, मुलगा आणि ग्रामसवेक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात


- देयक काढण्यासाठी मागितली लाच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
ड्रेनेजच्या कामाचे दोन लाखांचे देयक काढून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सरपंचा, ग्रामसेवक, सरपंचाचा पती आणि मुलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले आहे.
ग्रामसेवक कैलास पंचमलाल बरडीया (५०) , सरपंचा अनिता रामभाऊ शिवरकर (४४) , रामभाऊ बिसन शिवरकर (५१) आणि कैलास रामभाऊ शिवरकर (२३) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार कंत्राटदार असून वर्धा जिल्ह्यातील ग्रामपंचायत बरबडी अंतर्गत ड्रेनेजचे ११ लाख रूपयांचे काम केले होते. यापैकी ९ लाख रूपयांची रक्कम त्यांना प्राप्त झाली होती. उर्वरीत दोन लाख रूपयांच्या देयकासाठी ग्रामसेवक कैलास बरडीया याने २५ हजार रूपये, सरपंचा व सरपंचाच्या पतीने ३२ हजार रूपये अशी लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने वर्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. सापळा कारवाईदरम्यान ग्रामसेवक बरडीया आणि सरपंचाचा मुलगा कैलास शिवरकर याच्याकडून रक्कम हस्तगत करण्यात आली. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक दुध्धलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब गावडे, पोलिस निरीक्षक रामजी ठाकूर, पोलिस निरीक्षक सुहास चौधरी , सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र बावनेर, पोलिस नाइक रोशन निंबोळकर, अतुल वैद्य, सागर भोसले, हरीदास खडसे, कैलास वालदे, प्रदिप कुचनकर, विजय उपासे, रागीणी हिवाळे, स्मिता भगत, अपर्णा गिरजापुरे, श्रीधर उईके यांनी केली आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2018-11-19


Related Photos