आ. डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी स्वच्छता सेवा व संवाद अभियान कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी :
  तालुक्यातील घोट परीक्षेत्रातील पेटतळा ,सिमुलतला ,शांतीनगर ,मंजेगाव ,दर्पणगुडा ,वरूर गांधीनगर ,घोट ठाकूरनगर ,नरेंद्रपूर ,सुभाषग्राम येथे भारतीय जनता पक्ष जिल्हा गडचिरोली च्या वतीने आमदार होळी यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी स्वच्छता सेवा व संवाद अभियान राबविण्यात आले.  
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाऊडस्पीकर व प्रचार रथाच्या  माध्यमातून स्वच्छता अभियान बाबत विशेष जनजागृती करण्यात आली.  आमदार डॉ.  होळी यांनी या भागातील शेतकरी, नागरिक यांच्यासोबत थेट संवाद साधून त्यांना केंद्र व राज्य सरकार च्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली. 
या अभियानाचे नेतृत्व गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.  यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दिलीप चलाख ,जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के ,पंचायत समितीचे सदस्य ,सुरेश कामिलवार ,चंद्रकला आत्राम ,प. स.  सभापती अकुली विश्वास, सरपंच राकेश बरसागडे ,उपसरपंच साईनाथ नेवारे ,नरेश अलसावार ,अनुप अधेंकीवार ,हेमंत उपाध्ये ,विकास मैत्र व पदाधिकारी उपस्थित होते. 
   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-21


Related Photos