ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता खेलो इंडियाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध


- खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३ ला केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीराज सिंग यांची भेट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : केन्द्रसरकारने खेळाडूंचा विकास व्हावा यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंना खेलो इंडीयाच्या माध्यमातुन एक व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे, यामुळे देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील खेळाडूंना एक भारत-श्रेष्ठ भारत ही भावनाही मनामध्ये रूजवून, मजबूत करीत आहेत, तसेच पुर्वी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचे स्थान सर्वात मागे होते, परंतु आज खेलो इंडिया अभियानापासून ते ऑलिंपिक व्यासपीठाच्या योजनेपर्यंत एक सर्वंकष दृष्टिकोन तयार करून आपला देश आंतराराष्ट्रीय स्तरावर आपले नाव मोठे करीत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीराज सिंग यांनी केले व खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३ च्या माध्यमातुन वर्धा लोकसभा क्षेत्रातील अनेक खेळातील खेळाडूंना एक नवे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याबद्दल खासदार रामदास तडस यांचे अभिनंदन केले व खेळाडूंना शुभेच्छा दिले.
खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव २०२३ अंतर्गत जिल्हा जलतरण तलाव येथे केंद्रीय ग्रामीण विकास एवं पंचायतराज मंत्री गिरीराज सिंग यांनी भेट दिली व विजेत्यांना पुरस्काराचे वितरण केले. यावेळी खासदार रामदास तडस, केन्द्रशासनाचे ग्रामविकास विभागाचे अतिरीक्त सचिव हुकुमसिंह मिना, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधिक्षक नुरुल हसन, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, मुख्याधिकारी राजेश भगत, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष व आयोजन समितीचे अध्यक्ष सुनिल गफाट व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले की, खासदार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-२०२३ च्या माध्यमातुन यावर्षी २२ खेळाचा समावेश केलेला आहे. यामध्ये साधारपणे सर्वच खेळाचा समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढेसुध्दा याप्रकारच्या स्पर्धा लोकसभा क्षेत्रात करण्यात येणार असल्याचे खासदार रामदास तडस म्हणाले व खासदार क्रीडा व केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री गिरीराज सिंग यांनी भेट देऊन खेळाडुंचा उत्साह वाढविल्याबद्दल आभार व्यक्त केले.
संचालन जलतरण असोसीएसचने रंजना वानखेडे तर उपस्थिताचे आभार नितीन डफळे यांनी मानले कार्यक्रमाला मुळे, सुनिल मांगुळकर, विपीन पिसे, वैभव तिजारे, दिपक भुते, सुनिता तडस, प्रणव जोशी, सौरभ कडू, सुधीर भुते, स्पर्धक व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.
News - Wardha