महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची बापुकुटीस भेट : प्रार्थनेस उपस्थिती, बेल वृक्षाचे केले रोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीत त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच परिसरात वृक्षारोपण केले.

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर उपस्थित होते. आश्रमात आगमण झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने सचिव विजय तांबे व विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. आश्रमात बापुंचे पहिले निवासस्थान असलेले आणि आता आदि निवास म्हणून ओळखल्या जात असलेल्या आदि निवाससह बापुंचे अनेक वर्ष वास्तव्य असलेल्या बापु कुटीस भेट देऊन पाहणी केली.

सोबतच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले बा निवास व बापुंच्या तत्कालिन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी बापुंचे निवास व बापुंशी संबंधित अनेक बाबींची माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींनी चरख्यावर प्रत्यक्ष सुत कताई केली. आश्रम भेटीनंतर त्यांनी बापुकुटी परिसरात बेल प्रजातीच्या वृक्षाचे रोपण केले. 

यावेळी प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी वान्मथी सी, विशेष पोलिस महानिरिक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी राष्ट्रपतींचे सेवाग्राम हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी त्यांचे स्वागत केले.





  Print






News - Wardha




Related Photos