महत्वाच्या बातम्या

 कृषी विज्ञान केंद्र चंद्रपूर तर्फे सघन कापूस लागवड तंत्रज्ञानावर भव्य शेतकरी मेळावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सिंदेवाही : भा. कृ. अ. प. केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर, भा. कृ. अ. प. अटारी पुणे आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही जि. चंद्रपूर, तर्फे विशेष कापूस प्रकल्पांतर्गत सघन कापूस लागवड तंत्रज्ञान विषयक भव्य शेतकरी मेळाव्याची आयोजन ६ मार्च २०२६ रोजी भिमनी ता. पोंभुर्णा येथे करण्यात आले होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. सोनाली लोखंडे,वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख केव्हीके सिंदेवाही,कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून स्वाती ढोबळे,तालुका कृषी अधिकारी पोंभुर्णा, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय सिडाम,विषय विशेषतज्ञ ,विस्तार शिक्षण तथा नोडल अधिकारी ,डॉ. वर्षा जगदाळे विषय विशेषज्ञ केव्हिके सिंदेवाही, नोवेल भडके,उमेद अभियानचे ब्लॉक मिशन व्यवस्थापक आणि संतोष कोसरे कृषी अधिकारी पोंभुर्णा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी केवीके सिंदेवाही राबवत असलेल्या विशेष कापूस प्रकल्पाची माहिती देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष पांडे यंग प्रोफेशनल-II  यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शनामधे डॉ. सोनाली लोखंडे यांनी युवकांनी आधुनिक यंत्राचा अवलंबन, शेती  मधील उत्पादित मालाचे मूल्यवर्धन करून  विक्रीतून आर्थिक उन्नती करावी असे आवाहन केले व उपस्थित शेतकऱ्यांची भाजीपाला व फळबाग लागवड या विषया संबंधी संवाद साधला. 

स्वाती ढोबळे यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून बघावे तसेच शासनांच्या विविध योजना विषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. विजय सिडाम यांनी सघन कापूस लागवड तंत्रज्ञान,एकात्मिक पोषण व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), सुधारित वाणांचा वापर व यांत्रिकीकरण यामुळे कापूस पिकाच्या उत्पादन खर्चात बचत होऊन प्रति हेक्टर उत्पादन व निव्वळ उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट केले व येणाऱ्या खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे आव्हान केले. 

नोबेल भडके यांनी उमेद अभियानांतर्गत महिला सक्षमीकरण यावर प्रकाश टाकला तर डॉ. वर्षा जगदाळे यांनी  विविध शेती पूरक उद्योयोग तसेच नैसर्गिक शेती विषयी संदर्भात सविस्तर माहिती दिली. संतोष कोसरे र्यांनी शेतकऱ्यांना कृषि महाविस्तार एआय ॲपची माहिती दिली. प्रकल्पा अंतर्गत असणारे शेतकरी सुभाष काळे यांनी सघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात वाढ झाली असे नमूद केले.

या मेळाव्याचे निमित्ताने कापूस पिकात सघन व अतिसघन तंत्रज्ञानाचा अवलंब करून भरघोस उत्पादन घेणाऱ्या निवडक प्रगतिशील शेतकरी बांधवांचा विशेष सन्मान करण्यात आला यामध्ये सुभाष काळे (भिमनी), .सुनील फरकाडे (चक खापरी) बापूजी झाडे (चक खापरी) यांचा समावेश होता. या मेळाव्यामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील भिमनी, चकखापरी, घाटकुळ, बामनी, चक ठाणेवासना, मोहळा, नवेगाव मोरे, व इतर गावातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष पांडे तसेच आभार प्रदर्शन  इ. यू.पेंदोर  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास कामडी, यंग प्रोफेशनल, सुभाष काळे, संदीप तायडे, ज्योती बोटरे, उमेद अभियाना अंतर्गत असलेले कृषी सखी, पशुसखी, कृषी उद्योग मित्र,  तसेच भीमनी येथील ग्रामस्थ व शेतकरी यांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos