महत्वाच्या बातम्या

 भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / सावली : ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार, खासदार किंवा मंत्री नसतानाही सावली तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी निष्ठेने काम करत आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून सावली तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.

सावली तालुक्यातील विविध गावांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत अनेक वेळा अधिकारी व पालकमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात येत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. अधिकारी वर्गाकडे अनेक तक्रारी देऊनही त्याची दखल घेतली जात नाही.

या पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदारांसमोर ही बाब मांडण्याचा निर्णय घेत असून, कार्यकर्ते व नागरिकांच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ मी माझ्या भारतीय जनता पार्टी सावली तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos