अर्थसंकल्पात सर्व घटकांच्या विकासाचा संकल्प : पालकमंत्री डॉ. अशोक वुईके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांचे प्रतिबिंब उमटले आहे. शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी, महिला, दुर्बल घटक आदिंच्या विकासाचा संकल्प अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच सामान्य नागरिकांचा विचार करून आर्थिक धोरणे राबवित असल्यामुळे लोकांचे जीवनमान सुकर झाले आहे.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी बजेटमध्ये २१७२३ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे.
यात राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, डॉ. एपीजे अबुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना आदींचा समावेश आहे. राज्यातील जनतेला या अर्थसंकल्पामुळे दिलासा मिळणार आहे.
– आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके
News - Chandrapur




Petrol Price




