प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत भामरागड शहरात सर्वांसाठी घरे योजना प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नगरपंचायत भामरागड कार्यक्षेत्रातील प्रभाग क्र. १ ते १७ मधिल मालमत्ता धारकांकडून ऑनलाईनद्वारे घरकुलाचा लाभ मिळण्याकरीता अर्ज मागविण्यात आलेले होते. प्राप्त अर्जापैकी एकुण ५६ पात्र लाभार्थ्यांचे DPR तयार करुन गृहनिर्माण शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडे मंजूरी प्रदान करण्यासाठी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास २३ फेब्रुवारी २०२६ रोजी गृहनिर्माण शहरी विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत मंजूरी मिळालेली असून लवकरच पात्र घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्याकरीता नगरपंचायत कार्यालय भामरागड कडून आदेश देण्यात येईल तसेच लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाच्या विवरणानुसार टप्या-टप्याने हप्ता (रक्कम) लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. सदर बाब ही भामरागड नगरपंचायत करीता खुप मोठे यश मिळाले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत नगरपंचायत भामरागड कार्यालयात घरकुलाचा लाभ घेण्याकरीता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून भामरागड शहरातील गरजू व पात्र लाभार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा. असे आव्हान अभिजीत किरण सोनवणे, मुख्याधिकारी न.पं. भामरागड व श्रीमती रामबाई कोमटी महाका, नगराध्यक्षा न.पं. भामरागड यांनी केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




