महत्वाच्या बातम्या

 डॉ. देवराव होळी व परिणय फुके यांचा मुंबईत परस्पर सत्कार : भाजपा संघटन बळकटीचा निर्धार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : माजी आमदार तथा भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान परिणय फुके यांची भाजपा प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार केला.

यावेळी विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनीही डॉ. देवराव होळी यांची महाराष्ट्र प्रदेश भाजपा आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. दोन्ही नेत्यांनी परस्पर अभिनंदन करत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी भाजपा कुरखेडा नगरपंचायतीचे बांधकाम सभापती बबलू हुसैनी, ॲड. विजय चाटे यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सत्कार समारंभामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.





  Print






News - Rajy




Related Photos