माजी आमदार डॉ. देवराव होळी भाजप आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भाजप आदिवासी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ४३ नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यामध्ये डॉ. होळी यांचा समावेश आहे. याआधी डॉ. होळी हे प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.
डॉ. होळी यांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बानवकुळे, माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे आणि ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सा. पोरेड्डीवार यांसह अनेक मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




