क्षयरोग निर्मूलन अभियानात नवी मुंबई राज्यात दुसरा क्रमांक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. महानगरपालिकेने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला असून २३ जानेवारीला पुणे येथे महानगरपालिकेचा सत्कार केला जाणार आहे.
स्वच्छता अभियानात राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य व इतर विभागांमध्येही दर्जेदार कामगिरी केली आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यावर लक्ष दिले जात आहे. या अभियानामध्ये देशातील ८० जिल्ह्यांचा समावेश होता. राज्यातील जिल्हे व महानगरपालिकांच्या कामाचा आढावा घेवून आरोग्य विभागाने क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिकेने पहिला क्रमांक मिळविला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने दुसरा क्रमांक मिळविला आहे. जालना जिल्ह्याचा तीसरा क्रमांक आला आहे.
२३ जानेवारीला पुणे मधील यशदा येथे होणाऱ्या कार्यक्रमात नवी मुंबई महानगरपालिकेचा सत्कार केला जाणार आहे.
News - Rajy