गडचिरोलीत हेल्पलाईन क्रमांक सुरू, आरोग्य सेवेसाठी आरोग्य कवच उपक्रमाची घोषणा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली शहरातील सामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अधिकृत हेल्पलाईन क्रमांक ८८ ०८ ०४ ०८ ०४ सुरू करून, नागरिकांना आरोग्याच्या संकटकाळात तातडीची मदत, योग्य मार्गदर्शन आणि शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
हेल्पलाईनद्वारे उपलब्ध होणार्या सेवा -
हेल्पलाईनद्वारे नागरिकांना शासकीय वैद्यकीय योजनांची माहिती, उपचारांसाठी आवश्यक शिफारस व कागदपत्र सहाय्य, तातडीच्या आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन, आणि संबंधित विभागांशी समन्वय साधण्यासाठी मदत दिली जाईल. आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना शासकीय योजनांच्या अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रांची माहिती देखील दिली जाणार आहे.
आरोग्य कवच उपक्रम -
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या हेल्पलाईन कक्षाला आरोग्य कवच म्हणून संबोधित केले. गडचिरोलीतील दुर्गम आणि आदिवासी भागातील रुग्णांना वेळेवर मदत मिळवता यावी आणि उपचाराअभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
सर्वांसाठी खुले व्यासपीठ -
गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना – विशेषत: माता-भगिनी, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना या हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम आरोग्यसेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




