महत्वाच्या बातम्या

 भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना : वाहतूक व्यवस्थापन सूचना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : २१ जानेवारी रोजी, नागपूरच्या जामठा येथील व्हिसीए स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होणार आहे. यासाठी नागपूर शहरातील वर्धा मार्गावर आणि परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी विशेष वाहतूक नियोजन केले आहे. क्रिकेट रसिकांना असलेली सुविधा, मार्गदर्शन, आणि पार्किंग व्यवस्था याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

वाहतूक नियोजन आणि मार्गदर्शन -
नागपूर पोलिस वाहतूक शाखेने समोरच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष मार्गदर्शन केले आहे. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले की, क्रिकेट रसिकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल.

वर्धा मार्गावर येणारी वाहने -
सामन्यासाठी जामठा येणाऱ्या वाहने वर्धा मार्गावरून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) मार्गाने डाव्या बाजूच्या रस्त्याने जावीत. एनसीआय मार्गावर पुढे गेल्यावर माऊली नगरजवळ डाव्या वळणावर पार्किंगच्या ठिकाणांकडे वळवले जाईल.

जामठा टी पॉईंटवरील मार् -
जामठा टी पॉईंटवरून स्टेडियम किंवा जामठा गावाकडे कोणत्याही वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही.

पार्किंग व्यवस्था -
सामन्यादरम्यान विविध वाहतुकीच्या साधनांसाठी वेगवेगळी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे.

कक्ष ए : व्हीआयपी, पोलिस, आणि प्रसार माध्यमासाठी.

कक्ष बी : चारचाकी वाहने.
कक्ष सी (अन्विता फार्म) : दुचाकी वाहने.
कक्ष डी-१ : एका बाजूस चारचाकी, दुसऱ्या बाजूस दुचाकी पार्किंग.
कक्ष डी-२, डी-३, डी-४, डी-५, ई (अल्ट्राटेक) : चारचाकी वाहनांसाठी पार्किंग.
कक्ष जी : केवळ सदस्यांसाठी पार्किंग.
कक्ष एच : फक्त स्कूल बससाठी.
कक्ष आय : राखीव पार्किंग.

वर्धा मार्गे येणाऱ्या वाहतुकीसाठी मार्गदर्शन -
कक्ष एफ (ब्रह्मकुमारी) : वर्धा मार्गे जामठ्याकडे येणाऱ्या वाहतुकीसाठी कक्ष एफ मध्ये पार्किंग उपलब्ध आहे. येथे एका बाजूला दुचाकी आणि दुसऱ्या बाजूला चारचाकी वाहने पार्क केली जातील. स्टेडियमसाठी फिडर बसची व्यवस्था केली जाईल.

स्कूल बससाठी विशेष मार्गदर्शन -
स्कूल बस वाहनांना एनसीआय समोर युटर्न घ्यावा लागेल आणि पुढे गेट नंबर १३ समोर उपलब्ध पार्किंग कक्षात वाहने पार्क करावी लागतील.

जामठा टी पॉईंटवर प्रवेश -
जामठा टी पॉईंटवरून कोणताही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. फक्त खेळाडू आणि अंपायर यांच्या वाहना पासून हा मार्ग बंद राहील.

मेट्रोचा वापर करा - कोंडी टाळा -
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी क्रिकेट रसिकांना मेट्रोचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषत: ज्या वाहने जामठा टी पॉईंट क्रॉस करणार आहेत, त्यांच्यासाठी अल्ट्राटेकपुढील पार्किंग उपलब्ध राहील. वाहतूक पोलिसांनी दिशादर्शक नकाशा जारी केला असून, वाहनचालकांना याचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

सामन्यापूर्वी आणि नंतर मार्ग टाळावा -
क्रिकेट सामन्यासाठी येणारे नसलेले वाहनचालकांनी २१ जानेवारी रोजी सामन्यापूर्वी सायंकाळी ५ ते ७ आणि सामन्यानंतर रात्री १० ते ११.३० दरम्यान जामठा मार्गावरून प्रवास टाळावा, असे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos