महत्वाच्या बातम्या

 गोंदिया जिल्ह्यात अ‍ॅग्रिस्टॅक नोंदणीचा ९८% टक्के प्रगती : शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा मिळेल थेट लाभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : कृषी विभागासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळवण्यासाठी शासनाने अ‍ॅग्रिस्टॅक प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला युनिक क्रमांक देणारी फार्मर आवडी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

२ लाख ५९ हजार ८७७ शेतकरी गोंदिया जिल्ह्यात नोंदणीसाठी पात्र -
महसूल विभागाच्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ५९ हजार ८७७ शेतकरी नोंदणीकृत आहेत. त्यापैकी २ लाख ४९ हजार ८७७ शेतकऱ्यांनी अ‍ॅग्रिस्टॅक प्रणालीत नोंदणी पूर्ण केली आहे, ज्याचे प्रमाण ९८.१६ टक्के आहे. मात्र, अजूनही २,८८८ शेतकऱ्यांची नोंदणी शिल्लक आहे.

आशय: फार्मर आयडी का आहे आवश्यक? -
शासनाच्या कृषी योजनांमध्ये फार्मर आयडी (युनिक आयडी) असणे अनिवार्य आहे. भविष्यात पीक विमा, नुकसानभरपाई, मोफत बियाणे, तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी अॅग्रिस्टॅक प्रणाली महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

गोंदिया तालुका नोंदणीमध्ये आघाडीवर -
गोंदिया तालुका ९८% नोंदणी पूर्ण करून जिल्ह्यात आघाडीवर आहे. सर्व तालुक्यांमध्ये नोंदणीचे प्रमाण वेगवेगळे आहे.

तालुकानिहाय नोंदणी आकडेवारी  - 

तालुका     एकूण शेतकरी   झालेली नोंदणी
आमभाव        २७,१३३              २ ५,६१४
अर्जुनी मोर     ३२,१७१             ३१,७६८
देवरी              २४,०५९                २३,६०९
गोरेगाव          २७,४३६              २५,९२६
सड़क अ.         २५,५८२              २४,७७२
लेकसा             २०,७४५             २०,४१३
तिरोडा            ४०,९६२                 ४०,८१४
एकूण             २,५९,८७७          २,५४,८१६

नोंदणी विलंब का?
गावात शेती करणारे शेतकरी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करीत असले तरी, शहरात राहणारे शेतकरी नोंदणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. अल्पभूधारी शेतकऱ्यांमध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अॅग्रिस्टॅक प्रणाली आवश्यक नसल्याचा गैरसमज निर्माण झालेला आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी नोंदणी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे.

शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जनजागृती -
महसूल व कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली गेली आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना नोंदणीसाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे लवकरच संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.





  Print






News - Gondia




Related Photos