गडचिरोलीत बिएसएनएल ची इंटरनेट सेवा ठरत आहे डोकेदुखी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरासह जिल्हाभरात बिएसएनएल चे ग्राहक पसरले आहेत मात्र इंटरनेट सेवा कासवगतीने चालत असल्याने ग्राहकांना  डोकेदुखी ठरत हे. जिल्हाभरात इंटरनेटचे जाळे पसरले असून बिएसएनएल हि एकमेव इंटरनेट सेवा आहे जी जिल्हयातील अतिदुर्गम भागापर्यंत पोहचवते. अनेक शासकीय, खासगी कार्यालय, प्रतिष्ठाने तसेच नागरिक आपल्या मोबाईलमध्ये बिएसएनएल च्या इंटनेट सेवेचा उपयोग करतात. अनेक ग्राहक आपल्या मोबाईलमध्ये थ्रीजी इंटरनेट सेवेचा प्लान ॲक्टीव करतात मात्र इंटरनेट सेवा कधी टुजी तर कधी नेटवर्कच नसल्याने ग्राहकांनी ॲक्टीव केलेला प्लान बिनकामाचा होत असल्याचे दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये बिएसएनएल विरोधात संतप्त झाले आहेत.  बिएसएनएल फायबर ऑप्टीक मार्फत जलद गतीने इंटरनेट सेवा देण्याचे सांगते तर जिल्हयात काही महिन्यांपासून इंटरनेट सेवाच कासवगतीने चालत असल्याचे दिसत आहे. यामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. शासकीय तसेच खासगी बॅंकेत सुध्दा बिएसनएनच्या इंटरने सेवेचा उपयोग केला जातो मात्र इंटरनेट सेवा कासवगतीने चालत असल्याने अथवा कधी इंटरनेट सेवाच बंद असल्याने त्याचा फटका बॅंक ग्राहकांना बसत असून अनेक तासनं तास बॅंकेत ताटकळत बसावे लागत आहे. गोंडवाना विद्यापीठामार्फत ऑनलाईन परिक्षा राबविण्यात येत असुन अतिदुर्गम भागात बिएसएनएलची सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थ्यांना सुध्दा त्याचा फटका बसला यामुळे अनेक विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहिले आहे. याबबत वरिष्ठांनी विशेष लक्ष घालुन जिल्हयातील बिएसएनएनची इंटरनेट सुविधा सुव्यवस्थीत करावी अशी मागणी होत आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-03-16


Related Photos