महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या गडचिरोली येथील पक्ष कार्यालयात पक्षाचा २७ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अमोल कुलमेथे होते.

यावेळी शहराध्यक्ष अमोल कुळमेथे यांनी पक्ष स्थापनेचा इतिहास, पक्षाची वाटचाल आणि संघटनात्मक बळकटी याविषयी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे विचार व धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात झालेल्या विविध विकासकामांवर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी कटिबद्ध राहावे, असे आवाहनही अमोल कुळमेथे यांनी केले.

या कार्यक्रमाला नगरसेवक रवी मेश्राम, नगरसेविका माधुरी मांगरे, सेवादल जिल्हाध्यक्ष सुभाष धैत, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नंदगाये यांच्यासह गिरीश खाडिलकर, रामदास मंगरे, अजय कुकडकर, लंकेश वाढणकर, अश्विनी नंदगिरवार, किरण मंगरे, आरती कोल्हे तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात पक्षाच्या भावी वाटचालीबाबत चर्चा करण्यात आली असून, आगामी काळात संघटन विस्तार आणि जनसंपर्क अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला.





  Print






News - Gadchiroli




Related Photos