महत्वाच्या बातम्या

 खडका येथील निम्न पैनगंगा प्रकल्पातील ५३ संशयित आरोपी अटकपूर्व जामीनासाठी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात


- पुढील सुनावणी ११ डिसेंबर २०२५ रोजी

विदर्भ न्युज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : (NIMNA PAINGANGA PROJECT at TADSAWLI / KHADKA) आर्णी तालुक्यातील खडका शिवार येथे आंतरराज्यीय निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम सुरू असतांना धरण विरोधी संघर्ष समिती व इतर परिसरातील गावकऱ्यांनी बेकायदेशीर जमाव करून, दहशत निर्माण करुन, शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी ५७ संशयित आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक ६१६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहीता कलम १३२, १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३२४ (५), ३२९ (५) सह कलम ३ सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक कायदा, सह कलम ७ फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम अंतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. 

दरम्यान, सदर प्रकरणातील ५७ पैकी ५३ संशयित आरोपींनी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. शर्मा यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या म्हणजे ११ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. विशेष म्हणजे सदर प्रकरण सद्यातरी उत्तर व म्हणने (REPLY / SAY) मांडण्यासाठी आहे.

संशयित आरोपी विजय सिताराम राऊत सह ५२ संशयित आरोपीचे वकील ऍड. अजय मारोतराव डाखोरे हे संशयित आरोपीची बाजू सत्र न्यायालयात मांडणार आहे. 

सदर प्रकरणात पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी (POLICE INSPECTOR HEMANT CHAUDHARI) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक गजानन बास्टेवाड (Police Sub Inspector GAJANAN BASTEWAD) पुढील तपास करीत आहे.

फिर्यादी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे उप अभियंता श्यामसुंदर प्रल्हादराव टेंभरे (वय ५३, आर्णी ह. मु. रा. कोल्हे ले आऊट, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून पारवा पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल देवानंद बनसोड यांनी सदरचा गुन्हा कायम केला आहे. या मुळे निम्न पैनगंगा प्रकल्प धरण विरोधी संघर्ष समितीत व इतर गावातील संशयित आरोपी मध्ये खळबळ माजली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उप अभियंता निम्न पैनगंगा प्रकल्प विभाग, आर्णी श्यामसुंदर टेंभरे हे खडका येथील निम्न पैनगंगा प्रकल्प स्थळी उपस्थित होते. सदर प्रकल्पाचे काम सुरू असतांना धरण विरोधी संघर्ष समितीचे विरोधी लोक तेथे आले. विरोधाचा भाग म्हणून शनिवारी २९ नोव्हेंबर २०२५ निम्न पैनगंगा प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडण्याकरिता वरील संशयित आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून, दहशत निर्माण करुन, लोकसेवक कायदेशीर काम करित असतांना बळाचा वापर करून, शासकीय मालमत्तेचे नुकसान करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामावरील वाहन व कार्यालयावर दगडफेक करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले. तसेच बळजबरीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम बंद पाडले, अशी फिर्याद निम्न पैनगंगा प्रकल्पाचे उप अभियंता श्यामसुंदर टेंभरे (आर्णी) यांच्या लेखी तक्रारीवरून ५७ संशयित आरोपी विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे पारवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.

संशयित आरोपींचे नांव असे: विजय राऊत (वय ५२, रा. वरुड तुकाराम), प्रल्हाद जगताप (वय ७०, रा. दातोडी), प्रल्हाद गावंडे (वय ५८, रा. उमरी कापेश्वर), मुबारक तंवर (वय ५०, रा. सावळी सदोबा), भास्कर जगताप (वय ४८, रा. दातोडी), डॉ. बाबा डाखोरे (वय ६०, रा. गोकुळ गोंडेगांव), गजानन डाखोरे (वय ५१, रा. मदनापूर), संदीप उर्फ बंटी जोमडे (वय ४०, रा. रामपूर), प्रविण भगत (वय ४०, रा. झापरवाडी), रामेश्वर पेंदोर (वय ३४, रा. झापरवाडी), दिपक पेंदोर (वय ४०, रा. झापरवाडी), अंकुश मेश्राम (वय ४०, रा. झापरवाडी), मिथुन मडावी (वय ३५, रा. झापरवाडी), सोमेश्वर गेडाम (वय ४०, रा. झापरवाडी), कैलास मंगाम (वय ४२, रा. झापरवाडी), पंकज पवार (वय ३०, रा. झापरवाडी), माधव उईके (वय ३५, रा. झापरवाडी), सुनील पुसणाके (वय ३५, रा. झापरवाडी), विकास ठाकरे (वय ४५, रा. दातोडी), अमोल खडसे (वय ३५, रा. आयता), जयकुमार जगताप (वय ३०, रा. दातोडी), योगेश जगताप (वय ३५, रा. दातोडी), भुवन मुनेश्वर (वय ३०, रा. पळशी), रवि भोंगाडे (वय ४५, रा. दातोडी), नितीन मडावी (वय ३५, रा. उमरी), सतीश नागोसे (वय ४०, रा. उमरी), सिताराम वगारहांडे (वय ३४, रा. उमरी), राजेंद्र नागोसे (सावळी सदोबा), मंगेश देशमुख (वय ३५, रा. कापेश्वर), अजय नेमाडे (वय ३६, रा.कापेश्वर), विक्की चोरे (वय २७, रा. कापेश्वर), प्रविण नकाते (वय ३५, रा. कवठा), राजू भोयर (वय ३९, रा. कवठा), दत्ता ठाकरे (वय ४५, रा. कवठा), शामराव गावंडे (वय ६०, रा. कवठा), रवी भोनाडे (वय ४५, रा. उमरी), नितीन मडावी (वय ३५, रा. उमरी), सुरेश मडावी (वय ४०, रा. उमरी), गोपाल खोडे (वय ४५, रा. गुडा), विजय खोडे (वय ४५, रा. गुडा), नाना खोडे (वय ३५, रा. गुडा), अतुल वानखडे (वय ४६, रा. उमरी), बंडू राठोड (वय ६०, रा. चिचखेड), सतीश जगताप (वय ४५, रा. पाथरी), ज्योतीराम मंडलवार (वय ३०, रा. पाथरी), श्रावण पुसणाके (वय ३२, रा. चिमटा), सुरेश बोंतावार (वय ४८, रा. दहेली), मंजीता शिंदे (वय ४०, रा. आयता), बंडू नाईक (वय ६०, रा. चिचखेड), विष्णू जगताप (वय ५५, रा. दातोडी), गुलाब मेश्राम (वय ४५, रा. रामपूर), बंडू जगताप (रा. पाथरी), दादाराव खाती (रा. दातोडी), जयराम मिश्रा (रा. सायफळ), दिपक देशमुख (रा. कापेश्वर), अजय काकडे (वय ३५,  रा. उमरी) व सुप्रीया गावंडे (वय ४५, रा. वाई बाजार) आदीं विरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तथापि, ११ डिसेंबर २०२५ रोजी यवतमाळच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सुनावणीत संशयित आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होते वा कसे, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. 

पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पारवा पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानन बास्टेवाड पुढील तपास करीत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos