गुगलच्या इयर इन सर्च २०२५ अहवालात महाकुंभ आणि धर्मेंद्र सर्वाधिक शोधले गेले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : २०२५ हे वर्ष संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना गुगल इंडिया ने आपल्या ‘इयर इन सर्च २०२५ चा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात २०२५ मध्ये भारतात सर्वाधिक कोणते विषय आणि घटना गुगलवर शोधले गेले याचे तपशील दिले आहेत. यावर्षी क्रीडा, तंत्रज्ञान, मनोरंजन, तसेच राष्ट्रीय घडामोडींवरील विषयांबाबत सर्चची संख्या सर्वाधिक होती.
गुगलने जाहीर केलेल्या यादीत महाकुंभमेळा २०२५ हा सर्वात जास्त शोधला गेलेला विषय ठरला आहे. त्यानंतर धर्मेंद्र यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेषतः धर्मेंद्र यांच्याबद्दलची सर्चसुद्धा चर्चेत राहिली, कारण त्यांच्या आरोग्याबद्दल आणि धर्मेंद्र जिवंत आहेत का? या प्रश्नावर सर्च करण्यात मोठ्या प्रमाणावर रुची दाखवण्यात आली.
बिहार निवडणूक निकाल २०२५ हा तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंधांवरील घडामोडी चौथ्या क्रमांकावर, तर दिल्ली निवडणूक निकाल पाचव्या क्रमांकावर सर्वाधिक शोधले गेले.
गुगलच्या अहवालानुसार, धर्मेंद्र यांच्या आरोग्याबद्दलचे सर्च विशेष उल्लेखनीय आहेत.धर्मेंद्र जिवंत आहेत का? या प्रश्नावरील सर्चमध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. याशिवाय, त्यांच्याशी संबंधित विविध अन्य प्रश्न, विशेषतः त्यांच्या आरोग्यविषयक अद्ययावत माहितीबद्दलच्या सर्चसुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाल्या.
या अहवालावरून स्पष्ट आहे की भारतीय नागरिकांचा जास्तीचा चुरामणी क्रीडा, धर्म, राजकारण आणि सेलिब्रिटींसोबतच्या घडामोडींबद्दल होता. जनतेने त्यांची उत्सुकता गुगलवर शोधून पूर्ण केली, याचा हा स्पष्ट संकेत आहे.
News - Rajy




Petrol Price




