महत्वाच्या बातम्या

 अवकाळी, गारपिटीमुळे राज्यातील २ लाख ९९ हजार हेक्टरवरील पिके नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात मार्च महिन्यातील गारपीट व अवकाळी पावसाचा राज्यातल्या तब्बल १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टरवरील पिकांना प्रचंड फटका बसला आहे. यामध्ये शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे, पण शिंदे-फडणवीस सरकारने अद्याप मदत जाहीर केलेली नाही.

राज्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडीचे सदस्य प्रचंड आक्रमक झाले होते. निषेध घोषणा, सभात्याग अशी लोकशाहीतील विविध आयुधे वापरली. पण लवकरच पंचनामे पूर्ण करून मदत जाहीर केली जाईल अशी घोषणा सरकारच्या वतीने केली होती.

आता एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.

राज्यात ४ ते २० मार्च या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळपिके, भाजीपाला, गहू, हरभरा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. ४ ते ९ मार्च या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले, तर १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. मार्चअखेर एकूण १ लाख ९९ हजार ४८६ क्षेत्र बाधित असून हे सर्व पंचनामे करण्यात आलेले आहेत. शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिह्यांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. निधीच्या मागणीसाठी जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून तत्काळ निधी वितरणाला मंजुरी दिली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाने कळविले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos