राजगुरुनगरमध्ये जुन्या वादातून तरुणाचा गोळ्याघालून खून : आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे : जुन्या वादातून एका तरुणाचा गोळ्यांनी खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केतन शामराव कारले (वय २३, रा. चांदुस, ता. खेड) यांचा पिस्तुलाने डोक्यात, पाठीवर आणि पायावर गोळ्या घालून खून केला गेला.
ही घटना २७ तारखेला सकाळी साडेपाच वाजता घडली. मृतक केतन आणि त्याची पत्नी कुंकुम राजगुरुनगर येथे कोर्टाच्या कामासाठी दुचाकीवर जात होते. त्याच वेळी ठाकूर पिंपरी (ता. खेड) येथील कोळेकर वस्तीच्या शेजारी शुभम संतोष तांबे (रा. आसखेड, ता. खेड) आणि त्याचे दोन साथीदार केतन याला एकटे रस्त्यावर दिसले. त्यानंतर शुभम तांबे याने पिस्तुल काढून केतनच्या डोक्यात, पाठीवर आणि पायावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
खून झालेल्या केतन कारले याची पत्नी कुंकुम यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तातडीने आरोपी शुभम तांबे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपींचे अन्य साथीदारांचे नाव आणि पत्ते अद्याप मिळाले नाहीत. खेड पोलिस निरीक्षक सुभाष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, आरोपींच्या गजाआड करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न तेज केले आहेत.
News - Rajy




Petrol Price




