निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करा : आमदार डॉ.देवराव होळी


- गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा नाहक जीव गेल्याने  जनतेमध्ये असंतोष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
गडचिरोली जिल्ह्यात वाघाची भीती निर्माण झाली असून चांदाळा पोटेगाव मार्गावर इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या महिलेस भरदुपारी हल्ला करून वाघाने ठार केल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे  निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या वाघांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार डॉ. देवराव  होळी यांनी शासनाला केली आहे.
काही दिवसापूर्वी राजगाटा येथील एका इसमास अशाच प्रकारे वाघाने ठार करून दहशत निर्माण केली होती. चामोर्शी तालुक्यातही काही दिवसांपूर्वी घरामध्ये घुसून एका बिबट्याने महिलेचा बळी घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात अनेक गावांमध्ये वाघाचा वावर वाढलेला असून शेतामध्ये काम करणाऱ्या व फिरायला जाणाऱ्या  लोकांमध्ये वाघाविषयी धास्ती निर्माण झाली आहे.  त्यामुळे निष्पाप लोकांना मारणाऱ्या वाघांचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासनाला केली आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-12-18


Related Photos