महत्वाच्या बातम्या

 तरूणांनी उद्योग करून इतरांना रोजगार दयावा : खासदार सुनिल मेंढे


- उदयोजक मेळाव्याला उत्तम प्रतिसाद

- लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : सध्या मोठया प्रमाणावर रोजगाराच्या संधीची वाणवा आहे. तरूणांनी नोकरीच्या मागे न धावता उदयोग उभारावे. व त्या उदयोगाव्दारे इतरांनाही रोजगार दयावा असे आवाहन खासदार सुनिल मेंढे यांनी आज केले. लक्ष्मी सभागृहात आयोजित उदयोजक मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, प्रसिध्द उद्योगपती पंकज सारडा, विदर्भ इकोनॉमीक डेव्हलपमेंट कॉन्सीलचे देवेंद्र पारेख, सुक्ष्म व लघु उद्योग निदेशक प्रशांत पार्लेवार, खादी ग्राम उद्योगचे संचालक रघुवेंद्र महिंद्रकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक भुवनेश्वर शिवणकर, जिल्हा अग्रणी बँक व्यस्थापक तईकर, मुख्याधिकारी विनोद जाधव यासह आदी उपस्थित होते.

या उद्योजक मेळाव्याचे उद्घाटन खासदार सुनिल मेंढे यांनी यावेळी आयोजनामागची भुमीका स्पष्ट केली. जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना मार्गदर्शनाद्वारे उद्योजकतेचे देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उदयोग करून इतरांना रोजगार देणारे व्हा असा संदेश त्यांनी उपस्थित तरूण-तरुणांना यावेळी दिला. जिल्ह्यात 800 लोकांना स्वनिधी वाटप करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

जिल्ह्यातील प्रसिध्द उद्योजक पंकज सारडा यांनी शासन व प्रशासन उद्योग विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. विविध उदाहरणांव्दारे मेहनत व जिद्द असेल तर व्यापार- उद्योगातून आर्थिक समृद्धी साधता येते असे त्यांनी यावेळी सांगितले.

उद्योजक मेळावा हा एक्सचेंज ऑफ आयडीयाज असून यात बँक, उद्योजक, उद्योगपूरक शासन योजना व उद्योजक संधीच्या शोधात असलेल्या तरूण तरुणींसाठी दुग्धशर्करा योग असल्याचे विदर्भ इकोनॉमीक डेव्हलपमेंट कॉन्सीलचे देवेंद्र पारेख यांनी सांगितले. रोजगार-उद्योजकतेच्या अपार संधी असून त्यांनी यावेळेस कल्पकतेतून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रेरणात्मक व्हिडीओ आपल्या सादरीकरणात दाखवीले.त्यामध्ये त्यांनी एमबीए चायवालाचे उदाहरण दिले.

एप्रिल महिन्यात उद्योजक विकासासाठी तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा मानस सुक्ष्म व लघु उद्योग निदेशक प्रशांत पार्लेवार यांनी व्यक्त केला. या भंडारा- गोंदियाच्या सिमेवर धान उद्योगाशी संबंधित राईस क्लस्टर उभारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षपदावरून जिल्हाधिकारी श्री. कुंभेजकर यांनी शासकीय योजनांचा लाभ घेवून उद्योगाची सुरवात करावी .मात्र हे सगळे करतांना स्थानिक पातळीवर का होईना उद्योगांनी स्वत: ब्रँड तयार करावा. बँकेकडे सादर केलेल्या प्रस्तावाचा पाठपूरावा सातत्याने करावा. उद्योजकतेसाठी बँकाही सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन चैतन्य उमाळकर यांनी केले.


लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप


यावेळी उदयोगासाठी बॅकेकडून इच्छुक लाभार्थ्यांना बँकांन मार्फत कर्ज मंजुरीचे पत्र प्रातिनिधीक स्वरूपात वाटण्यात आले. त्यामध्ये वैभव साळवे, रंजना सेलोकार, मनोहर लाखे, नितेश ब्राम्हणकर, ईश्वरदास बरवे, शानु रामटेके, देवेंद्र जांभुळकर, मंगेश गणवीर, शिल्पा बावसरे, प्रकाश डोंगरे, प्रतिभा निनावे, आकाश आखरे यासह अन्य लाभार्थ्यांना कर्ज मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.

तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत उद्योग करताना कर्ज मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन व्हावे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून तरूणांनी उदयोजकते वळावे यासाठी हा मेळावा महत्वाचा असल्याचे श्री.मेंढे यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्र, खादी व ग्रामोद्योग, सुक्ष्म-लघु व मध्यम उद्यम, कौशल्य विकास केंद्र, जिल्ह्यातील सरकारी व खाजगी बँका विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते.         





  Print






News - Bhandara




Related Photos