महत्वाच्या बातम्या

 डोळ्यांवर घातक परिणाम करणाऱ्या लेझर लाईटवर प्रतिबंध


- भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १६३ लागू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यामध्ये आगामी काळात दहीहांडी, पोळा, तान्हा पोळा व सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहे. या सण उत्सव दरम्यान मोठ्या प्रमाणावर लेझर लाईटचा वापर केला जातो. या लाईटचा प्रकाश मानवी डोळ्यांसाठी घातक असून मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिक भाविकांच्या डोळ्यावर याचा प्रकाश पडल्यास डोळ्यांच्या पडद्यावर तसेच बुबुळावर गंभीर इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे 28 सप्टेंबर पर्यंत या लाईटच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच शांतता व कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी आगामी सण उत्सवाच्या कालावधीत २८ सप्टेंबर पर्यंत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वान्मथी सी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३चे कलम १६३ कलम लागू करुन लेझर लाईट वापरावर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर आदेश जिल्ह्यात ४ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर पर्यंत आगामी सण दहीहांडी, पोळा, तान्हा पोळा व सार्वजनिक गणेशोत्सव या कालावधीसाठी राहणार असून या कालावधीत  लेझर लाईट, हाय पॉवर बीम, लेझर शो यांच्या वापरावर प्रतिबंध राहणार आहे. सदर आदेशाची नागरिकांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे आहे.





  Print






Related Photos