चला वाचन संस्कृती जोपासुया..


- १५  ऑक्टोबर  ' वाचन प्रेरणा दिन'  निमित्ताने 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रभाकर कोळसे / नंदोरी :
  १५ ऑक्टोबर हा मिसाईल मॅन माजी राष्ट्रपती डाॅ ए पी जे कलाम यांचा जन्मदिन. त्यांच्या   सन्मानार्थ  राज्यभरात वाचन प्रेरणा दिन साजरा होत आहे. 
डाॅ ए पी जे अब्दुल कलाम हे भारताला लाभलेले असामान्य व्यक्तीमत्व.  भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न या अवलीयाने ऊराशी जपले आणि संपुर्ण भारतात एक नवचैतन्य निर्माण केले.  पण हे स्वप्न पुर्ण होण्याआधीच अब्दुल कलाम नावाचे मिसाईल काळाच्या पडद्याआड निघुन गेले.  त्यांच्या विचाराची ज्योत नेहमीच तेवत राहवी म्हणुन  महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने  त्यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून  सर्वत्र महाराष्ट्रात शाळा महाविद्यालयात साजरा करण्याचे ठरविले.   
 दिसामाजी काहीतरी ते लिहीत जावे ,प्रसंगी अखंडीत वाचीत जावे ..समर्थ रामदासांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा मोलाचा संदेश दिला आहे.  पण करमणुकीच्या साधनाच्या अतीभडीमारामुळे आज समाज वाचनापासुन दुर दुर जात असल्याचे काहीसे चित्र आहे.  टीव्ही , फेसबुक,  व्हाट्सअप यात तासनतास व्यस्त राहत असल्याने वाचन करणारी मंडळी दुरापास्त होत आहे.  यास्तव वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाने डाॅ ए पी जे अ कलाम यांच्या जयंतीचे औचीत्य साधुन १५ ऑक्टोबर हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणुन मागील वर्षी घोषीत केला. डाॅ अब्दुल कलाम वाचनकट्टा या नावाने शाळा महाविद्यालयात हा ऊपक्रम आज सर्वत्र महाराष्ट्रात साजरा होत आहे. 
वाचनातून मिळणारा आनंद त्यातून होणारे ज्ञानानर्जन हे अवर्णनीय.  त्याला शब्दात व्यक्त करणे अश्यक्य.  वाचनातुन मनाला आणि वैचारीक बैठकीला मिळणारे एक शास्वत स्वरूपाच अधिष्ठान हे जगातील दुसऱ्या कुठल्याच गोष्टीतुन मिळणार नाही कोणत्याही एका विषयाची पुस्तके जमा करून दहा वर्ष त्यावर चिंतन करा, अकराव्या वर्षी तुमची गणना एका विद्वानात केली जाईल.  एवढी अफाट ताकद पुस्तकात असते.  पुस्तकासारखा जीवलग मित्र शोधुनही सापडणार नाही.  डाॅ बाबासाहेब आंबेडकरानी पुस्तकानाच जीवलग मित्र मानले होते.  म्हणुनच ते विद्वतेच्या शिखरस्थानी विराजमान झाले.  डाॅ अब्दुल कलाम एकदा म्हणाले होते,  की पुस्तकाच्या  सहवासात मला अधिक आनंद आणि अमर्याद ज्ञान मिळते.  माझ्या घरात अध्यात्म विज्ञान प्रशासन ईतिहास,  भुगोल , वां:डमय अशा अनेक विषयाची पन्नास हजार पुस्तके आहेत . माझी ग्रंथसंपदा ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ठेव असल्याचे ते मानत होते.  २०२० पर्यत जर डॉ. कलाम यांचे देशाला महासत्ता बनवन्याचे स्वप्न पुर्ण करावयाचे असेल तर ईतर बाबीसोबतच वाचनाची आवड जोपासण्याची आज नितांत गरज आहे. 
आज वाचन प्रेरणा दिनी शाळा , महाविद्यालयीन विद्यार्थानी सामान्य ज्ञानात भर घालणारे दहा पुस्तकाने वाचन करणे अपेक्षीत आहे.  वाचन करू या आणि वाचन संस्कृती जोपासुया. 

   Print


News - Wardha | Posted : 2018-10-15


Related Photos