नागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / येनापूर :
जनावरांसाठी तणस आणत असताना सापाने दंश केल्याने विवाहित युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज १५  आॅगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशीच सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. 
सुरेश मारोती मदासवार (३२) असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार सुरेश मदासवार हा सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तणस आणण्यासाठी गेला असताना तणस काढताना सापाने दंश केला. त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई - वडील, भाऊ, बहिणी असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे मदासवार कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. सुरेश च्या मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-15


Related Photos