महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील विविध समस्यांना मिळाला न्याय : शेतकरी कामगार पक्षाचे यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : सामान्य माणसांसाठी शेतकरी कामगार पक्षाने गेल्या वर्षभरात फुटपाथ, अवैध रेती तस्करी, दवाखाना, सुरजागड लोह खाण, शेतकरी आत्महत्या, मेडीगट्टा यासह अनेक प्रश्नांचा रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्ष, पाठपुरावा करून यश मिळवले. जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य अशा, कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधीत्व नसतांनाही सदर प्रश्नांवरील यशस्वीता ही केवळ जनसामान्यांचे भक्कम जनार्थन शेतकरी कामगार पक्ष पाठीशी असल्यानेच शक्य झाले. 

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात शहरातील संघर्ष नगरासह अतिक्रमण धारकांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे घरटॅक्स लावण्याचे काम झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने फुटपाथधारकांची दुकाने हटविण्यात आले होते. शेकाप सातत्याने फुटपाथ धारकांसोबत राहून पुन्हा दुकाने लावण्यात आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन वेळा उद्घाटन होवूनही बंद असलेलया सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यास प्रशासनाला भाग पाडले. हजारो शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासाठी बँकांकडे पाठपुरावा करण्यात आले. 

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मागील चार वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा धरणग्रस्तांचा प्रलंबित प्रश्नाच्या शोडवणुकीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागले. येणाऱ्या नवीन वर्षात मासेमारी सहकारी संस्थांचे बळकटीकरण, पिण्याच्या पाण्याची बारमाही सुविधा, वाघाच्या हल्ल्यांबाबत दीर्घकालीन उपाययोजना, जंगलावर आधारित उद्योग, पेसा क्षेत्रातील रेती तस्करी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी, अन्यायग्रस्त कर्मचारी, कामगार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी दिले. 

पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, जयश्री वेळदा, अशोक किरंगे, सरपंच सावित्री गेडाम, चंद्रकांत भोयर, तुकाराम गेडाम, कविता ठाकरे, हेमंत डोर्लीकर, कैलास शर्मा, विनोद मेश्राम, योगेश चापले, तितिक्षा डोईजड, देवीदास मडावी, देवराव शेंडे, मारोती आग्रे उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos