सेवा संकल्प अभियानाअंतर्गत बार्टी व समाज कल्याण विभागातर्फे योजनांची माहिती व मार्गदर्शन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि समाज कल्याण विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियान अंतर्गत शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात आला. बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड तसेच समाज कल्याण विभागाच्या आयुक्त सुकेशनी तेलगोटे यांच्या मार्गदर्शानाखाली बार्टी प्रादेशिक आणि समतादूत विभागतील प्रकल्प अधिकारी आणि समतादूतांच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला.
नागपूर शहर, ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, वसतीगृह, अभ्यासिका यांच्या सहयोगाने कार्यक्रम घेण्यात आले. यात प्रियदर्शनी भगवती कॉलेज, भाऊसाहेब मुळक नर्सिंग कॉलेज, कुणाल विद्यालय वानाडोंगरी, नागसेन विद्यालय, पीएमबीएस कॉन्व्हेंट, बाबा बुध्दनगर अभ्यासिका, सतनाम वस्ती वाठोडा, कळमेश्वर येथील शैक्षणिक संस्थामध्ये बार्टीच्या प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास तसेच समाजकल्याणच्या वसतिगृह, शिष्यावृत्ती आणि वंचित सामाजाच्या कल्याणपर विविध योजनांची माहिती देण्यात आली. पर्यावरणाबाबत सजगता आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाबाबत प्रबोधन करण्यात आले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी बार्टी प्रदेशिक कार्यालयातील प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके आणि अधिकारी व समतादूत विभागातील प्रकल्प अधिकारी हृदय गोडबोले, अल्ताफ कुरेशी, मोहित शेख, सतीश सोमकुवर, मंजुषा मडके आदी समतादूतांनी परीश्रम घेतले.




Petrol Price




