महत्वाच्या बातम्या

 विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज : नागपूरसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्यात सध्या पुराने थैमान घातले असून, आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन ते चार दिवस विदर्भातील अनेक भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा प्रादेशिक हवामान खात्याने दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, या कालावधीत विदर्भातील तापमान आणखी खाली जाणार असून, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस व विजांच्या कडकडाटासह हवामान अस्थिर राहील.

यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडणे टाळावे व सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे प्रादेशिक हवामान खात्याचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos