५ हजारांची लाच स्वीकारतांना हत्तीरोग अधिकारी कार्यालयातील सहायक अधिक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनीधी / गडचिरोली :
मासीक पगार व दिवाळी अग्रीम काढण्याच्या कामाकरिता ५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना हत्तीरोग अधिकारी कार्यालय धानोरा जि . गडचिरोली येथील सहायक अधिक्षकावर एसीबीने करावाई केली आहे. प्रभाकर तात्याजी लांडगे (५६) असे लाखखोर सहायक अधिक्षकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनूसार तक्रारदार हे वैद्यकीय बिल मंजूरीस वरिष्ठ कार्यालयात सादर केल्याने व त्यांचे सह कर्मचारी यांचे मासिक पगार व दिवाळी अग्रम काढण्याच्या कामाकरिता सहायक अधिक्षक यांच्याकडे गेले. सहायक अधिक्षक प्रभाकर तात्याजी लांडगे यांनी तक्रारदारास ५ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली परंतु तक्रारदाराची लाच देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यानी तक्रार लाचलूचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे केली. दरम्यान सापळा कारवाईचे आयोजन केले असता काल ९ नोव्हेंबर २०२०  रोजी  हत्तीरोग अधिकारी कार्यालय धानोरा येथे पंचासमक्ष तडतोडीअंती ५ हजार रूपयांची लाच स्विकारतांना प्रभाक लांडगे हे मिळून आल्याने धानोरा पोलिस ठाण्यात कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलिस निरीक्षक यशवंत राउत, पोहवा प्रमोद ढोरे, पोशि गणेश वासेकर, महेश कुकुडकार, किशोर ठाकूर, चानापोशि तुळशिराम नवघरे, चापोशि घनश्याम वडेट्टीवार, मपोशि सोनी तावाडे, सोनल आत्रात सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केलीे आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-11-10


Related Photos