वरोरा उपजिल्हा रूग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू


- डाॅक्टरांचा निष्काळजीपणा असल्याचा मातेचा आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा :
स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात शनिवारी जन्माला आलेल्या एका नवजात बालकाचा  तीन दिवसात मृत्यू झाला. आज सोमवारी लसीकरणानंतर बाळ दगावले असून याला डाॅक्टरचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप बाळाच्या मातेने केला आहे. मागील महिनाभरातील ही दुसरी घटना आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवारी सोनु नामदेव पंधरे (२५) रा. सुमठाणा ही महिला प्रसुतीसाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल झाली. त्याच दिवशी दुपारी तिची प्रसुती झाली. प्रसुती साधारण झाल्याने बाळ आणि माता सुदृढ होते. गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर तिला नातेवाईकांनीसुध्दा भेट दिली. तिच्या सोबत असलेली तिची सासू बाळाची सुश्रुशा करीत होती. आज सोमवारी परिचारीकेने  बाळाला लस द्यायचे असल्याचे सांगून नेले. बाळाला दोल लस देण्यात आल्या. पोलिओचा सुध्दा डोज देण्यात आला. यानंतर बाळाला मातेकडे सुपूर्द करण्यात आले. दुध पाजण्यास सांगण्यात आले. दुध पाजल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासातच बाळ अस्वस्थ झाल्याचे मातेने सांगितले. लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. बाळाला प्राणवायुवर ठेवण्यात आले. तोपर्यंत त्याच्या ह्रदयाची हालचाल बंद झाली होती, असे मातेचे म्हणणे आहे. 
बाळाच्या मृत्यूची चौकशी करू : डाॅ. दुधे
नवजात बाळाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आत्ताच सांगणे कठीण आहे. नवजात बाळांमध्ये सडेन डेथ इनफॅन्ट सिम्डोम हा आजार दिसून येत आहे. यामुळे तो दगावला असावा. बाळाला देण्यात आलेली लस एकाच वेळी सहा बालकांना देण्यात आली होती. बाकीची बालके सुखरूप आहेत. यामुळे या बालकाचा मृत्यू कशामुळे झाला याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गोवर्धन दुधे यांनी दिली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-20


Related Photos