पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचा मानवाधिकार संघटनेतर्फे सत्कार


- गोविंदपूर येथील कार्यालयाला सदिच्छा भेट; गडचिरोलीत सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे करण्याचे मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : झाडीपट्टीतील नामवंत नाट्यकलावंत तथा गडचिरोली जिल्ह्याचे पद्मश्री डॉ. परशुरामजी खुणे यांनी गोविंदपूर येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीच्या निमित्ताने राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश व जिल्हा गडचिरोलीच्या वतीने त्यांचा सत्कार करून स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान डॉ. परशुराम खुणे यांनी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती जाणून घेतली. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या, मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी सुरू असलेले कार्य तसेच सामाजिक क्षेत्रातील संघटनेच्या आगामी उपक्रमांबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात सामाजिक कार्याची मोठी गरज असून, मानवाधिकार संघटनेने नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. संघटनेने जिल्ह्यातील सामाजिक कार्याला पुन्हा अधिक व्यापक स्वरूप देऊन जोमाने काम करावे, यासाठी डॉ. खुणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पदाधिकाऱ्यांकडून सत्कार -
कार्यक्रमाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांची प्रमुख उपस्थिती होती. गडचिरोली जिल्हा मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष रमेश अधिकारी तसेच भामरागड तालुका मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष भीमराव वनकर यांनी डॉ. परशुरामजी खुणे यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध भागांत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. नागरिकांमध्ये मानवाधिकारांबाबत जनजागृती करणे, वंचित व गरजू घटकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.
कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती -
या कार्यक्रमाला विवेक पाटील बुद्धे, देवानंद पाटील खुणे, राकेश भाऊ खुणे, सुदाम पाटील खुणे, संदीप पाटील भोवरे, अरविंद पाटील डोंगरवार, किशोर भाऊ खुणे, नितेश भाऊ खुणे यांच्यासह राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांच्या भेटीमुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, त्यांच्या मार्गदर्शनातून गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक कार्याला नवी दिशा व गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.




Petrol Price




