महत्वाच्या बातम्या

 काँग्रेसच्या वतीने तान्हा पोळ्यानिमित्त नंदी सजावट स्पर्धा : विजेत्या बालगोपालांचा सायकली देऊन गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तान्हा पोळ्याच्या निमित्ताने बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित नंदी सजावट स्पर्धेला बालगोपालांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ११ सप्टेंबर रोजी झालेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सायकली देऊन गौरविण्यात आले. सहभागी बालगोपालांना टिफिन बॉक्सचेही वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला नगराध्यक्षा डॉ. अल्का वाढई आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, चंद्रपूरचे संचालक डॉ. अनिल वाढई यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेतील नंदी सजावटीची पाहणी ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर,प्रा. डॉ. मनीष कायरकर, प्रा. डॉ. श्रावण बनासुरे, शिक्षक प्रवीण विघ्नेश्वर आणि दर्शना मोगरे यांनी केली. यावेळी डॉ. अल्का वाढई यांनी तान्हा पोळ्यासारख्या पारंपरिक सणांमधून संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व सांगितले. बालगोपालांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाला काँग्रेसचे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष इस्माईल ढाकावाला, ओबीसी सेलचे शहर अध्यक्ष गणपत ईटनकर, माजी नगरसेवक अशोक चिताळे, अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष नितीन सोयाम, संजय झिलेवार, नगर परिषद उपाध्यक्ष देवेंद्र आर्या, शहर अध्यक्ष अब्दुल करीम शेख, चंद्रपूर जिल्हा वाहतूक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नरेश मुंदडा, जिल्हा कार्यवाह दीपक धोपटे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अहमद ढाकावाला, दत्तू लोभाडे, रोहित तेजारे, गौरव बोखाडे, संदीप मोगाडे, राजेश पोहाणे, प्रदीप बुटले, संदीप बुटले, विजय तुमराम, सागर लाबांडे, महादेव लाबांडे, अशोक चिनाके, संदीप टोंगे, बंडू फुलझले, सनी गडगे, कैलास कानमवार, अनिल लाटारे, मनोज लाटारे, स्वप्निल तोडे, आकाश नागपूरे, आकाश, संजू ठाकूर, अजय तामखाने, संकेत बागसरे, अशोक तांद्रा, रवी डोटावार आणि पंकज वडरे यांनी सहकार्य केले.





  Print






Related Photos