सानामध्ये इस्रायलचे हवाई हल्ले : दोन ठार, पाच जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / साना : हुथी बंडखोरांनी केलेल्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इस्रायलने रविवारी येमेनची राजधानी साना येथे जोरदार हवाई हल्ले चढवले. शहरातील बहुतेक निवासी भागात स्फोटांचे आवाज घुमले. हेझियाज पॉवर प्लांट, गॅस स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र इस्रायलकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाचहून अधिक जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजधानीच्या साबिक चौकाजवळ धुराचे लोट उठताना दिसले. राष्ट्रपती राजवाडा आणि बंद पडलेल्या लष्करी अकादमी परिसरातही स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्फोट इतका तीव्र होता की घर हादरले आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या, असे एका रहिवाशाने सांगितले.
लाल समुद्रात तणाव वाढला -
पॅलेस्टिनी संघर्ष वाढल्यानंतर हुथी बंडखोर सतत इस्रायलशी संबंधित व्यापारी जहाजांवर हल्ले करत आहेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने नोव्हेंबर २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत १०० हून अधिक जहाजांना लक्ष्य करण्यात आले. दरवर्षी जवळपास १ ट्रिलियन डॉलर्स किमतीचा माल या मार्गे जात असल्याने मोठे नुकसान झाले आहे.
अमेरिका-हुथी करार निष्फळ -
गेल्या वर्षी मे महिन्यात अमेरिकेने हुथींशी करार करून लाल समुद्रातील हल्ले थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हुथींनी स्पष्टपणे सांगितले होते की ते इस्रायलशी संबंधित लक्ष्यांवर हल्ले करत राहतील. परिणामी, इस्रायल आणि हुथी यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे.
News - World




Petrol Price




