महत्वाच्या बातम्या

 एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता इयत्ता ६ वी ते ९ वी साठी निवासी प्रवेशाबाबत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / गडचिरोली : प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी. जि. गडचिरोली यांचे कार्यक्षेत्रा अंतर्गत अहेरी / मुलचेरा/ सिरोंचा हे तीन तालुके येत असून सदर तालुक्यातील इयत्ता ६ वी, ७ वी, ८ वी, ९ वी मध्ये प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जामातीच्या विद्यार्थ्या करिता एकलव्य रेसिंडेशियल स्कूल, मध्ये प्रवेश घेण्याबाबत इच्छुक पालकांनी विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी व शासकीय / अनुदानित / आदिवासी मुला / मुलींचे वसतिगृह येथून विनामुल्य अर्ज प्राप्त करुन ३ जानेवारी २०२३ पर्यत सादर करावे. इयत्ता ६ वी ते ९ प्रवेश मिळण्याकरिता अर्टी व शर्ती पुढील प्रमाणे. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छीत विद्याथी अनुसूचित जमातीच्या असावा. पालकांचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले अनुसूचित जमातीच्या दाखल्याची सांक्षाकित प्रत सादर करावी. कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न ६ लक्ष इतके मर्यादित राहील. पालक दारिद्रय रेषेखाली असेल तर त्या संबधाचा दाखला जोडावा. शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये इयत्ता ५ वी तसेच ६ वी ते ८ वी चे वर्गात शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे निवड स्पर्धा परिक्षेच्या माध्यामातून करण्यात येईल. व गुणवंता धारंक विद्यार्थ्यानाचा प्रवेश देता येईल. खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश कोणतेही वेळी रद्द करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चित झाल्या नंतर कोणत्याही परिस्थितीत पालकांचा व पाल्यांचा विनंती नुसार शाळा बदलता येणार नाही. याबाबत पालकांनी हमी पत्र सादर करावे. आदिम जमतीच्या विद्यार्थ्यासाठी ५% जागा आरक्षित राहील. तसेच अनुसूचित जमातीच्या दिव्यांग विद्यार्थ्यासाठी ३% जागा आरक्षित राहील. असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी यांनी कळविले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos